ममदापूरात नामफलक अनावरण

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ विद्या मंदिर या ममदापूर ग्रामपंचायतमधील निवासी भागाला श्री समर्थ नगर असे नाव देण्यात आले आहे. ममदापूर ग्रामपंचायत कडून या नामफलक अनावरण करण्यात आले असून निवासी भागात राहणार्‍या रहिवाशी यांनी ममदापूर ग्रामपंचायतकडे श्री समर्थ नगर नावाची मागणी केली होती.या नामकरण बाबत स्थानिक रहिवाशी यांच्याकडून ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा केला जात होता.

शेवटी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नेरळ विद्या मंदिर परिसराला श्री समर्थ नगर असे नाव देण्याचा ठरावाची कार्यवाही करण्यात आली. सरपंच दामा निरगुडा यांचे हस्ते श्री समर्थ नगर असे नामकरण असलेला फलक अनावरण करण्यात आले. यावेळी वैशाली डांगरे, संजय राठोड, नंदीनी शिनारे, चंद्रकांत शिनारे, शिवराम घोडविंदे, शंकर घोडविंडे आदी सह स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने उपस्थित होते

Exit mobile version