उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर; ८ महिला, ३ पुरुषांचा समावेश

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात काहींना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांता उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नागरिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही काहींवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती:-
कार्यक्रमाच्या समारोपानंतर काहीना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व 3 पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:-
1) महेश नारायण गायकर, वय 42, वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा, मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील, वय 54, म्हसळा रायगड
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे, वय 51, गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी, वय 30, शिरसाटबामन पाडा विरार
5) तुळशीराम भाऊ वांगड, वय 58, जव्हार पालघर
6) श्रीमती कलावती सिद्धराम वायचळ, वय 46, सोलापूर
7) श्रीमती भीमा कृष्णा साळवी, वय 58, कळवा ठाणे
8) श्रीमती सविता संजय पवार वय 42, मुंबई
9) श्रीमती पुष्पा मदन गायकर, वय 64 वर्ष, कळवा ठाण
10) श्रीमती वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, करंजाडे
11) मीनाक्षी मोहन मिस्त्री, वय 58, वसई पालघर

Exit mobile version