मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलणार?

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांत बदल करण्यासंदर्भात (दि.12) मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावे लवकरात लवकर बदलण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे याविषयी म्हणाले की, मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकरशेठ हे नाव ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्राला देण्यात आला आहे. किंग्ज सर्कलचं तिर्थकर पार्श्वनाथ करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई सेंट्रल, मरीन लाईन्स, डॉकयार्ड स्टेशनची नावे बदलण्यात येणार आहेत. याशिवाय करी रोड, सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड, चर्नी रोड आणि कॉटनग्रीन या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.

Exit mobile version