प्रो गोविंदा संघांचे नामकरण

। ठाणे । प्रतिनिधी ।

प्रो गोविंदा सीझन 2 मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा बांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेल येथे पार पडला.
गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ज्याप्रमाणे क्रिकेट, कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला. त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन 2 मोठ्या जल्लोषात 18 ऑगस्ट रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. प्रो गोविंदा सीझन 2 साठी 16 संघांची निवड करण्यात आली.

गोविंदा पथकांचे नाव
कोकण नगर (कोकण गिन्ट्स), यश गोविंदा पथक (लातूर लेजेण्ड्स), आग्रेश्‍वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर), शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल), हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल), ओम ब्रह्मांड साई गोविंदा (सेट्रल मुंबई), ओम साई सेवा मंडळ (नवी मुंबई स्ट्राईकर), बाल उत्सव गोविंदा (मिरा भाईंदर योद्धा), विघ्नहर्ता गोविंदा पथक (पुणे पँथर), अष्टविनायक गोविंदा पथक (अमरावती ग्लाडीटर्स), बालवीर गोविंदा पथक (कोल्हापूर किंग), शिव साई क्रीडा मंडळ (नागपूर निन्जा), आर्यन्स गोविंदा पथक (ठाणे टायगर), साईराम गोविंदा पथक (बारामती ब्लास्टर), हिंदमाता गोविंदा पथक (वेस्टर्न मुंबई).
Exit mobile version