रानबाजिरे गाळमुक्त होण्यासाठी नामचा पुढाकार ?

| पोलादपूर | प्रतिनिधी |

महाड शहरातील दरवर्षी उदभवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी विविध उपाय योजना सुरू आहेत. याचा एक भाग म्हणून पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण् गाळमुक्त करण्यासाठी आता नामसंस्थेने पुढाकार घेतला आहे. धरणाच्या बॅकवॉटर आणि पुढील बाजूच्या स्टेलिंग बेसिस जलाशयाची खोली गाळ साठल्याने कमी झाल्याचे निदर्शनास आले असून पावसाळ्यानंतर तातडीने नाम फाऊंडेशनच्या तज्ज्ञांचे पथक रानबाजिरे धरणाच्या परिसराचे अवलोकन करणार असल्याची माहिती मनामम जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी मनाममचे तालुक्यातील कार्यकर्ते हेमंत भोईटे यांनी दिली.
यंदा 2023 मध्येदेखील पूरस्थिती उद्भवल्यामुळे आता नाम फाऊंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेले पाणीविषयक काम करणारी संस्था याप्रश्नी पुढाकार घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले असे आहे. गेल्यावर्षी धरणाच्या बॅक वॉटरची पातळी 43 आरएलपेक्षाही कमी करण्यासाठी सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पुराच्या पाण्याचा महाड शहराला 2022 मध्ये फटका बसला नव्हता. मात्र, यावर्षी पावसाळयापूर्वी केवळ स्टेलिंगबेसिसच्या जलाशयाचे पाणीच रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे यंदा पुन्हा 2023 मध्ये महाड शहराला पुराच्या पाण्याचा काही भागात सामना करावा लागला होता.

Exit mobile version