। मुंबई । वृत्तसंस्था ।
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी महान योद्धे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनने आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना डिवलचं आहे.
नाना पाटेकरांची पोस्ट काय? त्यांनी लिहिलं आहे की, "मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत. त्याबद्दल अभिनंदन. जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा". नानांच्या या पोस्टवर कोथळा काढलाय पण तुम्हाला डोळ्यावरील पट्टीमुळे दिसत नाही, भ्रष्टाचाराचा कोथळा काढायचा म्हणजे स्वत:च्या सरकारवर वार केल्यासारखं होईल. महाराजांच्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढणार नाहीत, उलट विरोधी व सत्ताधारी हे दोघेही भ्रष्टाचाराचा विरोध करतील आणि त्याचाच आर्थिक कोथळा काढतील, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
तसेच, शिवरायांनी ज्या दिवशी अफजलखानाचा वध केला त्यादिवशीच ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जातील असे म्हटले जात आहे. शिवरायांची ही वाघनखे अनमोल ठेवा असून ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.