जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नाना पाटील विद्यालय अंतिम विजेता

। पेझारी । वार्ताहर ।

क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत, जिल्हा क्रीडा कार्यालयद्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे कर्जत तालुक्यातील दिलकॅप रिसर्च इन्स्टिट्यूट नेरळ येथे आयोजन केले होते. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील कोएसो नाना पाटील विद्यालयाचे तालुकास्तर कबड्डी स्पर्धेतील अंतिम विजेते चार संघ सहभागी झाले होते.


मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटातील कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेते स्थान प्राप्त करतांना संबंधित विद्यालयाच्या संघाकडून बॉबीकुमार यादव, दिप हुजरे, जय चव्हाण, राहुल गाडे, मनिष, यश, योगेश शुभम पाटील, पियुश जाधव, अपूर्व ओव्हाळ, ओम जुईकर यांचा खेळ या गटाच्या स्पर्धेत निर्णायक होता. तर मुलांच्या 17 वर्षाखालील वयोगटात फक्त एक गुणांनी अंतिम सामन्यात सुधागड तालुका संघाकडून पराभव झाला. अंतिम उपविजयी संबंधित विद्यालय संघाचे खेळाडू रतिश पाटील, वरुण भगत, पारस शिद, तन्मय धुमाळ, अथर्व केणी, आयुष पाटील, अंशकुमार गिरी, कुणाल जुईकर, विपुल पाटील, यश थळे, पार्थ म्हात्रे या खेळाडूने प्रतिनिधीत्व केले.

मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटातील विद्यालयाचा कबड्डी संघ मुंबई उपनगर येथे होणार्‍या, मुंबई विभाग स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. संबंधित संघाना मार्गदर्शन क्रीडा मार्गदर्शक पुरुषोत्तम पिंगळे यांचे तर प्रोत्साहन विद्यालयाचे मुख्याध्यापक के.के. फडतरे यांचे होत आहे.

माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, माजी आ. पंडित पाटील, राज्य कबड्डी असोशिएशनचे कार्यवाह आस्वाद पाटील, माजी जि.प. सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, युवानेते सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, शाळा समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ या सर्वांनी संबंधित खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version