नांदगाव केंद्राचा बालमेळावा

| मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |

पंचायत समिती मुरूड अंतर्गत समूह साधन केंद्र नांदगांवच्या वतीने आनंददायी बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रात रायगड जिल्हा परिषदेच्या 20 शाळेचा अंतर्भाव होतो.. या शाळांनी एकत्र येऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या आनंददायी बालमेळाव्याचे उद्घाटन मुरूड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी यांनी केले. तसेच त्यांच्या समवेत जिल्हा स्काऊट गाईडचे जिल्हा समादेशक हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे व संयोजक हेमकांत गोयजी, रूपेश बांद्रे हेमंत नांदगावकर यांनी स्वागत केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्ताक्षर स्पर्धा, इंग्रजी साभिनय कविता स्पर्धा, इंग्रजी प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा , इंग्रजी गोष्ट सादरीकरण स्पर्धा, चित्र रंगभरण स्पर्धा व प्रश्नमंजुषा इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आल्याचे कार्यक्रमाचे संयोजक हेमकांत गोयजी यांनी सांगितले.

कोरोना नंतर पहिल्यांदाच नांदगाव केंद्राने आनंददायी बालमेळाव्याचे आयोजन करून शैक्षणिक गुणवत्तेस पूरक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नांदगाव केंद्रातील शिक्षकांबद्दल गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी यांनी काढले. अशाच प्रकारच्या गुणवत्तापूर्ण कार्यक्रमासाठी येत्या शैक्षणिक अर्थसंकल्पात लाखो रूपयांची तरतूद केली जाईल असेही जाहीर केले. नांदगाव केंद्रातील शिक्षक हे मेहनती व उपक्रमशील आहेत. सर्वांनी एकत्र येऊन हा आनंददायी बालमेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.

या स्पर्धांचे परीक्षक जलदिप तांडेल, राजेंद्र पाटील, संगिता खानावकर, सारिका वाटवे, हर्षा नांदगावकर, बाळासाहेब फुंदे,पल्लवी भोईर, राजेंद्र साळावकर, प्रमोदिनी म्हात्रे, नरेश पाकले, जयवंत देडगे, श्रद्धा म्हात्रे आदींनी काम पाहिले. तर मनिषा वाघरे, रंजिता केमकर, गजानन दांडेकर, राम कमाने, सुरेश कणसे, अनंत थळे, मंगेश गोयजी, चेतन चव्हाण, राजेंद्र बुल्लू, ओंकार भोई आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version