नांदगाव हायस्कूलची मतदान जागृतीसाठी प्रचार फेरी

| मुरुड जंजिरा | वृत्तसंस्था |

भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ठरवले आहे. याच उद्देशाने गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या आदेशानुसार, मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सहजीवन विद्यामंडळ संचलित श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंत नगर येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरील प्रभात फेरी ही खारीक वाडा या गावातून, नांदगाव बाजारपेठ मधून सुळपेठ मार्गे पुन्हा शाळेत आणण्यात आली. सदरील फेरीमध्ये सुमारे 450 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. प्रभात फेरीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दतात्रेय खुळपे सर, प्रतीक पेडणेकर सर, सागर राऊत , शिक्षक प्रतिनिधी महेश वाडकर व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विशेष प्रयत्न केले. प्रभात फेरीमध्ये मतदान बाबत लोकांमध्ये जागृती होण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या तसेच विविध फलक तयार करण्यात आले होते. मतदानाचे महत्त्व लोकांना पटावे यासाठी या रॅलीचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version