| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचा माघी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असला तरीही मंदिरालगत दोन कि.मी. अंतरावरील असलेल्या गणेशनगरातील मंदिरातही आज श्रीगणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा केला जातो आहे. या परिसरात वड, पिंपळ, भेंडी आदी पुरातन झाडे होती. स्थानिक ग्रामस्थ त्यांची दररोज पूजाअर्चा करीत असत. कालांतराने येथील वस्ती वाढत गेली आणि त्यांनी येथे एक कौलारू मंदिर बांधले होते. गेल्या काही वर्षांपूर्वी सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून येथील ग्रामस्थ गणेशोत्सवाबरोबरच अन्य कार्यक्रमही या मंदिरात साजरे करतात.







