ममदापूर उपसरंचपदी नंदिनी शिनारे

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या नंदिनी ज्ञानेश्‍वर शिनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अनिकेत गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिनारे यांची बिनविरोध निवड झाली.


ममदापूर ग्रामपंचायतचे उपसरंच शेकापचे अनिकेत गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे थेट सरपंच दामा निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नंदिनी ज्ञानेश्‍वर शिनारे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी सरपंच दामा निरगुडे यांनी निर्धारित वेळ संपल्यानंतर उपसरंचपदी नंदिनी शिनारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सरपंच निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी निरगुडे, चंद्रकांत शीनारे, जुबेर पालटे, नहीदा पांजेकर, अनिकेत गायकवाड, कल्पना डांगरे आदी उपस्थित होते. उपसरंपचपदाच्या निवडणूक कामी ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांनी पिठासीन अधिकारी यांना सहकार्य केले.


तर नवनिर्वाचित उपसरपंच नंदिनी शिनारे यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी सरपंच सखाराम शिंगे, पुंडलिक शिनारे, माजी उपसरपंच रामदास शिनारे, माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद्र भोईर, दत्ता निरगुडे, आशिफ लगड, मच्छिंद्र ताम्हाणे, सखाराम शिंगे, संदीप शिनारे, परवेज पालटे, कृष्णा शिंगे, माधव शिंगे, अरुण हिसाळके, जयेश शिनारे, वामन शिनारे, ज्ञानेश्‍वर शिनारे, अफजल अन्सारी, गजानन डांगरे, रोहित कराळे, मिलिंद शिंगे आदी उपस्थित होते.

Exit mobile version