वायशेत संघास उपविजेतेपद
| खारेपाट | वार्ताहर |
नागेश्वर क्रीडामंडळ आवास यांच्या विद्यमाने स्व. दयानंद पां. राऊत व स्व. अजिंक्य वि. कवळे यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदाईदेवी नांदाईपाडा संघ विजेता, तर जयहनुमान संघ वायशेतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक गावदेवी मुशेत, तसेच चतुर्थ क्रमांक गावदेवी धोकवडे संघाने पटकाविला.
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू तुषार पाटील-नांदाईपाडा, उत्कृष्ट चढाई- चंदन सिंग वायशेत, उत्कृष्ट पकड- प्रतिक सावंत-मुशेत, पब्लिक हिरो-अभिषेक म्हात्रे-धोकवडे, नवोदित खेळाडू-अंश धोडसेकर व अंतिम सामन्यात सामनावीर-चंदन सिंग-वायशेत या सर्व खेळाडूंनी उल्लेखनिय खेळी केली.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य माजी राष्ट्रीय खेळाडू रणजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागेश्वर क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा आवास ग्रामपंचायत येथील मैदानात खेळविण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आवास ग्रामपंचायत सरपंच अभिजित राणे, दीपक राऊळ, दामोदर गावडे, गणेश राणे, सुधाकर राऊळ, देविदास म्हात्रे, सुधीर राऊळ, विशाल पाटील, नागेश्वर क्रीडा मंडळाचे सर्व सभासद व ग्रामस्थ यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ खेळाडू रणजित राणे, सरपंच अभिजित राणे, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले. स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत क्रीडा प्रेक्षक व महिलावर्ग उपस्थित होता. उपस्थित सर्व मान्यवरांचे नागेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले.