| पेझारी | वार्ताहर |
को. ए सो.च्या विविध शाखांमध्ये सुमारे 39 वर्षे प्रामाणिक सेवा केलेले लेखनिक नंदू पाटील हे वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. को.ए सो. नाना पाटील हायस्कूल चे वरिष्ठ लेखनिक नंदकिशोर जगन्नाथ पाटील( मुळगाव घसवड) हे 38 वर्षे आठ महिने दहा दिवस इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर लेखनिक पदावरील सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन सेवानिवृत्त झाले त्यांनी को. ए. सो. मध्ये केलेल्या प्रामाणिक योगदानाबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार आणि सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी, आनंदमय जावो यासाठी शुभेच्छा समारंभ को. ए. सो. ना.ना. पाटील संकुलाच्या सुलभाकाकू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानी सेवाकाळात त्यांनी स्वतःचे दैनंदिन कामकाज, समाजकारण आणि राजकारण यांचा समतोल योग्यरित्या सांभाळला. त्यांच्या अंगी असलेली उत्तम कर्तव्यनिष्ठा आणि प्रशासनाबद्दल अचूक माहिती असल्याने या धकाधकीच्या काळातही ते निष्कलंक सेवा करू शकले असे गौरवोद्गार माजी आ. पंडित पाटील यांनी सेवानिवृत्ती सोहळा समारंभात काढले.
याप्रसंगी राजीप माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, शाळा समितीचे सदस्य यशवंत पाटील, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, तृप्ती पिळवणकर, उदय पाटील, समीर भोईर तसेच सत्कारमूर्ती नंदकिशोर पाटील सौ पाटील, कन्या रूपाली पाटील, मुलगा, सून, कुटुंबीय, स्नेही, मित्रपरिवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असा मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले तर आभार नम्रता भाटे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र म्हात्रे, देवेंद्र पाटील, सुनील पाटील, अविनाश पाटील, प्रसन्न राठोड, सुनिता पाटील व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







