नंदकुमार काळबेरे यांचे निधन

| कोर्लई | वार्ताहर |

शिंपी समाज ज्ञाती बांधव आणि रोहा तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी तथा जुन्या पिढीतील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार नंदकुमार महादेव काळबरे यांचे शुक्रवारी (दि. 16) रोजी सकाळी पुणे येथे निधन झाले. निधनसयमी ते 75 वर्षांचे होते. प्रकृती बरी नसल्याने ते पुणे येथे मुलाकडे वास्तव्यास होते. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदकुमार काळबेरे यांच्या चार पिढ्यांपासून भालगाव येथे गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना होता. शाडूच्या मातीची सुबक मूर्ती, डोळे आखणी आणि आकर्षक रंगकाम या मुळे येथील मूर्ती 20 गावांतून प्रसिद्ध होत्या. सन 2016 पासून त्यांना प्रकृती साथ देत नसल्याचे कारणाने गणेशमूर्ती उद्योग बंद करावा लागला होता. धार्मिक प्रवृत्ती असणारे नंदकुमार काळबेरे यांनी काही काळ भालगाव जिल्हा परिषद स्थानिक शाळा समिती चेअरमन पद देखील भूषविले होते. त्यांचे उत्तरकार्य 25 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार आहे.

Exit mobile version