। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली.
नितीन देशमुख म्हणाले, निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाही. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.
आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला : वैभव नाईक आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय, त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही. मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असो दोन आमदार भेटले त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं की, निकाल आमच्याविरोधात जाणार आहे. निकाल आमच्या विरोधात गेला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.