। पनवेल । वार्ताहर ।
शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असलेल्या खारघर शहरातील तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचे काम सध्या खारघर शहरात सुरू आहे. शहरातील अनधिकृत पानटपर्यांसह रात्रीच्या अंधारात अमली पदार्थ, बंदी असलेला गुटखा तसेच विदेशी बनावटीची विविध उत्पादने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून, स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खारघर शहर आणि तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या घटना अनेकवेळा उघड झाल्या आहेत. चरस, गांजा मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पानटपर्याच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचवले जात आहे.