नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 76 वे सत्र 14 सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबरला संबोधन करणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी मंगळवारी अमेरिका दौर्यासाठी रवाना झाले. यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधनासह जगातील नेत्यांची भेटही मोदी घेणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी जगातील जवळपास 100 देशांचे प्रमुख अमेरिकेत उपस्थित असणार आहेत. मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची 24 सप्टेंबरला भेट घेणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.