| धुळे | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचे वक्तव्य केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे असल्याचा विश्वासही यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे म्हणत, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या 100 टक्के जागा पुढे असून, तिसऱ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.