| चिरनेर | प्रतिनिधी |
नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा मंगळवार, (दि.12) मार्च रोजी सकाळी दहा वाजता नवघर उरण येथील कानकेश्वरी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास्थळी भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्यात पादुका व गुरुपूजन सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन आणि पुष्पवृष्टी होणार आहे. आपल्यातील सत्वगुण जगण्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो. जगण्याची उमेद वाढते. सात्विकतेमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यास सात्विकच कारणीभूत असते. असा बोध अनेक साधुसंतांच्या प्रवचनातून ऐकवायला मिळत असते. या पादुका दर्शन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर रायगड जिल्ह्याच्या स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.