नरेंद्राचार्य महाराज संस्थान महारक्तदान शिबीर

एकूण 210 रक्तदात्यांनी केले रक्तदान

। उरण । वार्ताहर ।

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या माध्यमातून उरण तालुक्यातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 210 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्ताची गरज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महारक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासो कालेल, अधिकारी कर्मचारी वर्ग, प्राची नायर, डॉ. रुची पुनामिया, डॉ. गौरव, डॉ. सिमरन, सोपान ठोंबरे, ज्ञानेश्‍वर पाटील, दीपाली पाटील, रमाकांत बंडा, त्रिवेणी ठाकूर, नंदा बंडा, मिीनल जोशी, देवेश गाताडी, जनार्दन भोईर, पांडुरंग भोईर, संगीता पाटील, सुजीत पाटील, प्रिया पाटील व सर्व संग्राम सैनिक, युवा सेना यांनी विशेष मेहनत घेतली.

महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थलॅसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्‍चित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वत्र रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली असून उरणमध्ये आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिंळत आहे.

Exit mobile version