संजय भोईर यांना मातृशोक

| शिहू | प्रतिनिधी |

पेण पंचायत समितीचे माजी सभापती संजय धाया भोईर यांच्या मातोश्री नर्मदा धाया भोईर यांचे मंगळवारी (दि.28) वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्या प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरानी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. 6 नोव्हेंबर रोजी पाली उद्धर येथे होणार आहेत. तर उत्तरकार्य रविवार दि. 9 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी जांभूळटेप मानी (नवीन वसाहत) येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version