ऑलिम्पियाडमध्ये वृत्तांत करंजुलेला सुवर्णपदक

राज्यात 16 रॅक मिळवून यश संपादन

पनवेल, वार्ताहर

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडकडून घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मॅथ्स ऑलिम्पियाड स्पर्धेत कळंबोली कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी वृत्तांत नाना करंजुले याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने राज्यात 16 वा रँक प्राप्त करून एक्सलंट अच्युमेंट अवॉर्ड पटकावला आहे. याबद्दल त्याचे शाळेकडून अभिनंदन करण्यात आले आहे. ऑलिंपियाडही स्पर्धात्मक चाचण्यांची एक मालिका आहे जी मुख्यतः विज्ञान, गणित इत्यादी क्षेत्रांमध्ये दिली जाते. ही चाचणी इयत्ता 1 ते 12 मधील विद्यार्थ्यांना दिली जाते. ऑलिम्पिक स्पर्धा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आयोजित केल्या जातात. ऑलिम्पियाड परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक होय. या परीक्षांना पास करणे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट असते.

या आव्हानात्मक परीक्षेमध्ये सहभागी झाल्यानंतर मुलांना त्यांची ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होते. ही परीक्षा प्रतिष्ठीत आणि आव्हानात्मक समजले जाते. देशपातळीवर काही महिन्यांपूर्वी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडकडून परीक्षा घेण्यात आले होते. मॅथेमॅटिक्समध्ये कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये इयत्ता चौथी शिकणाऱ्या वृत्तांत करंजुले याने बाजी मारली आहे. हजारो विद्यार्थ्यांमधून त्याने महाराष्ट्रात 16 वी रँक घेतली आहे. सुवर्णपदक आणि सर्टिफिकेट देऊन 11 ऑगस्ट रोजी वृत्तांतला सन्मानित करण्यात आले. याबद्दल पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी नगरसेवक सतीश पाटील, माजी आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, पनवेलचे गटशिक्षणाधिकारी सिताराम मोहिते, शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, स्त्री शक्ती फाउंडेशन संस्थापिका विजया कदम, संकल्प फाउंडेशन अध्यक्षा वैशाली जगदाळे, कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे, भाऊसाहेब आहेर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना बामणे यांच्यासह इतरांनी वृत्तांत करंजुले याचे या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version