विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर बिनविरोध

सोमवारी अधिकृतपणे विधानसभेत होणार घोषणा

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार असून, या पदाकरिता माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी (दि. 8) आपला अर्ज भरला.

महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड होणार हे लक्षात घेऊन महाविकास आघाडीतर्फे कोणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर हे बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यामुळे अधिकृतपणे विधानसभेत हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सोमवारी याची घोषणा करतील.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आमदारांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावरून पोलिसांनी गावकर्‍यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र, रविवारी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर वगळता सर्व आमदारांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सत्ताधारी पक्षाच्या गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत, मनीषा कायंदे यांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून ईव्हीएमच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Exit mobile version