नासाची जेम्स वेब दुर्बिण अंतराळात

। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।
25 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, संध्याकाळी 5.30 वाजता अमेरिकन नासा संस्थेकडून ‘जेम्स वेब’ ही आधुनिक दुर्बिण अंतराळात पाठवली आहे. जगातील खगोल अभ्यासकांसाठी हा अत्यंत मोलाचा टप्पा ठरणार आहे. विश्‍व उत्पत्तीच्या अद्भूत व गूढ संकल्पनांचा शोध या टेलिस्कोपच्या माध्यमातून घेतला जाईल. या महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होता यावे या अनुषंगाने औरंगाबाद शहरातील विज्ञान व खगोल प्रेमी नागरिकांसाठी महात्मा गांधी मिशनचे एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब तर्फे जेम्स वेब अंतराळ दुर्बीणीचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लबमध्ये ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Exit mobile version