। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिक-सुरत विमानसेवा येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये उत्साह आहे. सध्या नाशिकहून मुंबई, पुणे, बंगळुरू अशी विमानसेवा सुरू आहे. मात्र, सुरतसाठी अशी सोय नव्हती. ही सेवा सुरू करा, अशी व्यापार्यांची मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. नाशिक-सुरत विमानसेवेसाठी स्टार एअर कंपनीने पुढाकार घेतला आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. त्यानंतर तिच्या फेर्या वाढवल्या जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.