नथुराम घडशी यांचे निधन

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तालुक्यातील भापट या गावचे तमासगीर नथुराम धाकु घडशी यांचे वयाच्या (74) व्या वर्षी भापट येथील रहात्या घरी निधन झाले. परीसरातील कोळवट, ताम्हणे करंबे, ताम्हणे करंबे वाडी, चिरगाव, श्रीकृष्ण वाडी, ठाकरोळी, पाणदरे, रूद्रवट, चिराठी, सांगवड या गावातील मंडळांनी जेष्ठ समाजसेवक व कलावंत म्हणून घडशी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी कोकणातील पारंगत असणारी पारंपरिक कला म्हणजे तमाशातर पूर्वीच्या काळी करमणूकीचा पर्याय तमाशा कला अवगत होती.

यावेळी भापट ग्रामस्थ मंडळ मुंबई, नवयुवक विकास मित्र मंडळ, बौद्ध जन युवा मंडळ (रजि.) मुंबई व स्थानिक आणि माता रमाई महिला मंडळ, ओम शिवसत्य क्रिकेट संघ यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, दोन सूना, नात व नातू असा परिवार आहे.

Exit mobile version