मुरूडमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेतील माजी मुख्याध्यापिका नैनिता कर्णिक यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायदा, अधिकाराची माहिती दिली. तसेच उदय सबनीस, ज्ञानेश्वर फलेभाई, अशोक बामगुडे यांनी या दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेतील माजी मुख्याध्यापिका नैनिता कर्णिक, गणेश दिवेकर, भावेश दिवेकर, सचिन कासेकर, सुबोध बामगुडे, जयेश चोडणेकर, विनोद बांद्रे, परेश तांबे, अमरिश आयरकर, महेश मानकर, संदेश मोहिते हे उपस्थित होते. तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक छाया तंबीब, वरसोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version