राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन संपन्न

। पनवेल । वार्ताहर ।

राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई कडून वाशी येथे नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी तसेच वस्तूंवरील वजन इ. माहिती बाबत प्रबोधन माहिती देऊन जनजागृती उद्देशाने आयोजन वैधमापन शास्त्र यंत्रणा वाशी नवी मुंबई विभागमार्फत करण्यात आले होते.

विक्रीसाठी असणार्‍या वस्तूंच्या आवरणावर एमआरपी, वजन, उत्पादनाची तारीख,पॅकेर्सवर पूर्ण पत्ता , ग्राहक, ई – मेल, दूरध्वनी क्रमांक इ. प्रिंट करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नागरिक ह्या सूचना तपासून घेत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. शासनाच्या वैधमापन शास्त्र विभाग अशा व्यापार्‍यांवर लक्ष ठेवते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व विक्रेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. या दिवशी ग्राहकहिताची जनजागृती करणारे कार्यक्रम राबविले जातात. या जनजागृतीचा एक भाग म्हणून वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने स्टॉल लावून वजनकाटे, वस्तू उत्पादनांवरील आवश्यक माहिती बद्दल प्रात्याक्षिके माहितीसह देण्यात आली.

Exit mobile version