केएमसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या के.एम.सी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.विनायक गांदल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी माजी प्राचार्य डॉ. महेश खानविलकर, प्रा. मोहन बल्लाळ, डॉ. डी. पी. गायकवाड, डॉ.उत्तम गाढे, प्रा.सुदाम भिसे, डॉ.विलास मगर, प्रा.नागोराव तारू, डॉ. शरद पंचगल्ले, प्रा. संजय डायरे, डॉ.अशोक पाटील, प्रा.मीनाक्षी ओसवाल आणि एन.एस.एस. प्रतिनिधी ऋतिक गवळी, प्रतिक पाटील, दर्शन किरकिंडे सर्व विभाग प्रमुख तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ.अमोल नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासक्रमात राष्ट्र सेवेची जोड 1950 ते 1969 मध्ये कशी झाली हे सांगितले तर डॉ. विनायक गांदल यांनी विद्यार्थ्थाना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना शेख हिने केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.संजय डायरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version