राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून बुधवारी (दि.24) राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांची भूमिका यावर सविस्तर विवेचन केले. तर, अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा किती अमूल्य आहे, यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य निशिकांत कोळसे, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी दिनेश पाटील, कपिल जोशी, श्वेतल झिंजे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद घाडगे, पूजा पाटील, कैलास सिंह राजपूत आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी केले.

Exit mobile version