राष्ट्रीय तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धा

| रसायनी | वार्ताहर |

सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, राजस्थान जागतिक तायक्वांदो संघटनेची मान्यताप्राप्त राष्ट्रीय संघटना इंडिया तायक्वांडो आयोजित सब-जुनियर, कॅडेट व जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2023-24 मध्ये रसायनी, रायगड व नवी मुंबईमधील श्रवण भोसले, करण खाडे व आयुष कदम यांची सब-जुनियर तर साईराज पाटील मुस्तफा शेख निहाल भोईर व प्रेम पाटणे यांची जुनियर महाराष्ट्र क्योरुगी संघामध्ये निवड झाली आहे.

पुमसे प्रकारात श्रवण भोसले व स्वराली माटेकर (सब-जुनियर जोडी), आशिष राडिये (कॅडेट वैयक्तिक-मुले) ओमकार चव्हाण व वियोना थेस्मा (कॅडेट जोडी), राज जाधव, ओमकार चव्हाण व आशिष राडिये (कॅडेट संघ-मुले) तसेच चैतन्य नागणे (जुनियर वैयक्तिक-मुले) महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. संजय भोईर यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

तायक्वांडो स्पर्धेत रायगड तृतीय

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2023-24 मध्ये रायगड संघाला पुमसे प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. तर क्योरुगी (सब-जुनियर) प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला. 11 सुवर्ण, 9 रौप्य व 11 कांस्य असे एकूण 31 पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात निनाद जितेकर, अमोल माळी, रोहित सिनलकर, अनुष्का लोखंडे, अपुर्वा देसाई तसेच तुषार सिनलकर यांनी प्रशिक्षक म्हणून तर मेघनाथ कुंभार, विशाल चव्हाण व निखिल ठुबे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

Exit mobile version