वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा


| कोर्लई | वार्ताहर |

कोकण उन्नति मित्रमंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम. ए. नगरबावडी यांच्या अध्यक्षतेखाली 25 जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला.

मतदान हा आपल्याला संविधनाने दिलेला अधिकार आहे. लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्राचार्य नगरबावडी यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देताना सांगितले. राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. नारायण बागुल यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी निबंध, वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपले विचार मांडले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्‍वास चव्हाण, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रा. डॉ. एन. बागुल यांनी आभार मानले .

Exit mobile version