। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय महिला कुस्तीपटू गौरी पुजारी हिने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ती अवघ्या 24 वर्षांची होती. तिच्या निधनाने तिच्या कुटुंबासह संपूर्ण कोल्हापूरला धक्का बसला आहे.
पंजाबमधील पटियालामध्ये नॅशनल इन्स्टिट्युट स्पोर्टसमध्ये महिला कुस्ती प्रशिक्षक म्हणून तिची निवड झाली होती. सेवेत असतानाच आठ दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी उपचारासाठी तिला सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असताना अचानक शुक्रवारी तिचे निधन झाले. तिच्या निधनाने पुजारी कुटुंबियांसह कोल्हापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गौरी पुजारी हिने राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली होती. तिने ऑल इंडिया चॅम्पियनशिप, म्हैसूर केसरी, महाराष्ट्र चॅम्पियनशिप पदक मिळवली होते. तसेच, अमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात कुस्तीपटू म्हणून काम केले होते.
राष्ट्रीय महिला कुस्तीपटू गौरी पुजारीचे निधन
