| कोलाड | वार्ताहर |
रोहा कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्यामार्फत सुधागड तालुक्यातील रासळ येथे नैसर्गिक शेतीची तत्वे आणि कार्यपद्धती या विषयी मंगळवारी (दि.1) एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शरद गोळे यांनी कर्यक्रमाचे उद्देश व रूपरेषा विषद केली. तसेच, डॉ. प्रमोद मांडवकर यांनी शेतीची सद्यस्थिती, पर्यावरणातील बदलत्या घटकाचा शेतीवर होत असलेला परिणाम व भविष्य कालीन उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. राजेश मांजरेकर यांनी नैसर्गिक शेतीचे नावे व कार्यपद्धती या विषयावर मार्गरदर्शन करतांना सांगितले की, शेतीमध्ये बिजामृत, जीवामृत, घनजीवामृत, गांडूळखत, दरवर्षी अर्क व वारसा स्थिती या गोआधारित शेतीपद्धतीमधील घटका विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून किल्ला कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर, डॉ. राजेश मांजरेकर व शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य शरद गोळे तसेच सुधागड पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी देवकर, सरपंच प्रणिता खाडे, कांचन यादव, सविता म्हस्के, विद्या सावंत, प्रविण खाडे, भरत देसाई, नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम
