नैसर्गिक शेती विषयक प्रशिक्षण

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुका कृषी विभागातर्फे चोरढे येथे तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती करण्यापासून जमिनीची पोत सुधारत असून रासायनिक खताचा अति वापर केल्यामुळे जमिनीची पोत खराब होत, असल्यामुळे आजच्या सर्व शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कांबळे यांनी नैसर्गिक शेती विषयक मार्गदर्शन केले तसेच कृषी पर्यवेक्षक मोहन सूर्यवंशी यांनी बिजामृत दशपर्णी अर्क जीवामृत कसे बनवावे याविषयी शेतकर्‍यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी मुरुड मनीषा भुजबळ यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची माहिती दिली तर कृषी पर्यवेक्षक रविंद्र सैंदाणे यांनी गट स्थापन करणे व गटांच्या योजनांबाबत माहिती दिली.

लेखापाल अमर पाटील यांनी कंपनी स्थापन करणे व त्याबाबतचे योजनांबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक विशाल चौधरी व आदिराज चौलकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सुनील सुदाम घाग कृषीमित्र यांनी केले प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेविषयीची माहिती आत्मा ऋतुजा म्हात्रे यांनी दिली. यावेळी चोरढे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रगतशील पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य अनिल चोरढेकर यांनी आभार मानले.

Exit mobile version