। उरण । वार्ताहर ।
वन्यजीवांची ही तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पाणवठा तयार करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार धुळवडीच्या दिवशी वन्यजीव आणि पक्षी यांची तहान भागविण्यासाठी चिरनेर पोंडा वन परिक्षेत्रातील दगड मातीने भरलेला निसर्ग निर्मित झरा दिवसभर आंगमेहनत करून पुनर्जीवित केला.
सगळीकडे दिवसें दिवस डोंगर जळत आहेत. हजारो वृक्ष आणि वन्यजीव जळून खाक होत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाड्याने सर्वच त्रस्त झाले आहेत.उकाड्याने पाण्याची पातळी पण कमी होत आहे. मानव पाण्याच्या शोधार्थ दुसरीकडे गेला तर त्याची शिकार होणार नाही. परंतु वन्यजीवांनी आपली जागा बदलली तर त्यांच्या जीवितास धोका संभवतो. वन्यजीवांची ही तहान भागविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पाणवठा तयार करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाची पूर्तता करीता चिरनेर पोंडा वन परिक्षेत्रातील एक झरा पुनर्जीवित केला. या कार्यासाठी संस्थेचे जयवंत ठाकूर, राजेश पाटील, शेखर म्हात्रे, राकेश शिंदे, सृष्टी ठाकूर, अनुज पाटील, तुषार कांबळे, प्रणव गावंड, सचिन घरत, चरण पाटील या सर्वांनी मोलाचे योगदान दिले.
वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी निसर्ग निर्मित झरा केला पुनर्जीवीत
