| पनवेल | प्रतिनिधी |
शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे पनवेल कार्यक्षेत्रातील 9 दुर्गांचा महासन्मान व स्त्री शक्तीचा जागर करण्यात येत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवशी नवदुर्गेचा सन्मान करण्यात येणार असून यामधे पनवेल कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, तसेच कला, क्रीडा, राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार अशा 9 क्षेत्रातील नामवंत स्रीशक्तीचा जागर व त्यांचा सन्मान करणार असल्याची माहीती क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी दिली आहे. या उपक्रमासाठी नाव नोंदणीकरिता 8652414343, 7400404342, 9224209188 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
नवदुर्गांचा होणार सन्मान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606