नवी मुंबई – पनवेलमध्ये पुन्हा छमछम

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पोलीस आयुक्तांच्या नियुक्ती नंतर नवी मुबंई – परिसरातील बंद झालेली लेडीज बार मधील छम छम पुन्हा एकदा सुरु झाली आहे. 27 जानेवारी पासून सुरु झालेल्या या बार मध्ये पुन्हा एकदा आंबट शौकीनाणी गर्दी करायला सुरवात केली आहेत. सध्या साडेनऊपर्यंत सुरु असलेले हे बारपूर्वीप्रमाणे रात्री उशिरापर्यत सुरु होतील अशी आशा बार चालक व्यक्त करत आहेत. डिसेंबर महिन्यात नवी पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली. भारंबे यांच्या नियुक्ती नंतर पोलीस आयुक्तालंय हद्दीतील जवळपास सर्वच नियमबाह्य व्यवसाय बंद झाले होते.

बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या या व्यवसाया मध्ये नवी मुंबई – पनवेल परिसरातील लेडीज बारचा देखील समावेश असल्याने लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार च्या नावावर रात्री उशिरा पर्यत सुरु असलेले हे बार पणे बंद होऊन रात्री उशिरा पर्यत सुरु असलेली छमछम पूर्ण पणे बंद झाली होती. मात्र 27 जानेवारी पासून जवळपास एक महिन्यापासून बंद असलेली ही छमछम पुन्हा सुरु झाली असून,आंबट शौकीनांची गर्दी पुन्हा एकदा बारमध्ये गोळा होऊ लागली आहे.

Exit mobile version