नवी मुंबईकरांना ई-वाहनांची भुरळ

इंधनाची बचत; सरकारकडून अनुदान

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांची नोंद करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नवी मुंबईकरांचा कल वाढला आहे.

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जानेवारी ते ऑक्टोबर 2022 मध्ये 891 दुचाकींसाठी नोंदणी झाली होती. या वर्षी याच कालावधीत एक हजार चार दुचाकींची नोंदणी झाली आहे; तर गेल्या वर्षी या कालावधीत 255 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली होती. या वर्षी ती 317 वर गेली आहे. सुरुवातील इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत नवी मुंबईकरांमध्ये निरुत्साह दिसत होता; मात्र या वाहनांमधील निरनिराळी वैशिष्ट्ये वाहनचालकांना भुरळ घालत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांना फार सर्व्हिसिंग करावे लागत नाही. काहीशा महागड्या असलेल्या दुचाकींवर प्रदूषण आणि इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळेही वाहनचालक या वाहनांकडे वळू लागले आहेत.

मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी टेम्पोंनाही मागणी वाढत आहे. 2022 मध्ये 19 टेम्पोंसाठी नोंदणी झाली होती. या वर्षी हा आकडा 104 वर गेला आहे. जवळपास चार पट झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या आकडेवारीवरून इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी वाढत आहे.

पूर्वीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. केंद्र सरकारही इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान देत आहे.

हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

ऑक्टोबर 2023 पर्यंतची नोंदणी

वाहन20232022
दुचाकी1004891
चारचाकी317255
बस7400
तीनचाकी0703
मोटार कॅब2309
तीनचाकी मालवाहू10419
ट्रक1000
Exit mobile version