संत गोरा कुंभार समाज मंडळाचा नवरात्रोत्सव

| म्हसळा | वार्ताहर |
संतगोरा कुंभार नवरात्रोत्सव,सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा मंडळ कुंभार समाज म्हसळा चा यावर्षी 29 वा नवरात्रोत्सव संपन्न होत आहे. मंडळाची स्थापना सन 1993 मध्ये म्हसळा येथील कुंभार आळी येथे झाली.

समाजाकडून या सर्व जातीधर्माच्या लोकांंचा यथोचित मानसन्मान केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील एक तरुण व्यावसायिक आणि सर्वाना सामावून घेण्याची कला असणार्‍या माजी कुंभार समाज अध्यक्ष तथा विद्यमानकुंभार समाज नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील भिकू अंजर्लेकर यांच्याकडे नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाची धुरा आहे, शासन दरबारी असणार्‍या समस्या समाज संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे.म्हसळा कुंभार समाज अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, दिनेश म्हशीलकर, गणेश बिरवाडकर, सतिश म्हशीलकर, विठोबा म्हशीकलर, सुजित बोरकर, अभय कलमकर, राजू म्हशीलकर, मनोज म्हशीलकर, संतोष कुडेकर, सुरेश कुडेकर, निलेश परबळकर, रमेश म्हशीलकर, योगेश म्हशीलकर, प्रतिक गोविलकर, चंद्रकांत गोविलकर, हरिश्‍चन्द्र गोविलकर, सुशील म्हशीलकर, नितिन बोरकर, भाई बोरकर,कुंभार समाज महिला मंडळ आणि संपूर्ण समाजबांधव यांचे फार मोठे सहकार्य लाभते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नऊ दिवस महिलांचा नियमित भजन व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नावरात्रोत्सवाच्या काळात नगरसेवक, संजय कर्णिक, नगरसेविका राखी करंबे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.बोरकर,विद्यमान उपनगराध्यक्ष संजय कर्णिक आणि सर्व मान्यवर कमिटी व समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version