| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी यंदा 75 ते 80 ठिकाणी सार्वजनिक व खासगी नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातही सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या आयोजन वाढ होत आहे. नांदगाव, तिसले, सर्वे, आगरदांडा आदी परिसरात आदिवासी बांधव देखील नवरात्रौ उत्सव साजरा करताना दिसून येतात. नवरात्रौत्सवात शांततेत आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरात ठिकठिकाणी मंडप, विद्युत रोषणाई, करण्यात आलेली दिसत आहे. रास दांडिया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा या निमित्ताने घेण्यात येणार असल्यामुळे सर्वत्र चैत्यन्यदायी वातावरण पसरले आहे. मुरूड शहराची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवीच्या मंदिरात देखील दर वर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष नयन कर्णिक यांनी दिली आहे. मंदिरात देवीला सकाळी घोसाळ्याचा कळा वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी असते. सदर देवस्थान ऐतिहासिक काळातील असून साक्षात्कारी मानले जाते.