। गडब । वार्ताहर ।
सेन्सीटिव्ह वॉरियर्स गडब आयोजित पुरुष गट जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत नवतरुण कारावी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक बाळनंद कासू, तृतीय क्रमांक जय हनुमान उचेडे, चतुर्थ क्रमांक ओम साई कोळवे संघाने मिळविला. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू राज पाटील (नवतरुण कारावी), उत्कृष्ट चढाई परेश कोळी (ओम साई कोळवे उत्कृष्ट पकड दर्शन मोकल (नवतरुण करावी) पब्लिक हिरो निलेश चोगले, (बाळनंद कासू ) स्पर्धेचे पारितोषिक वितरण सामाजिक कार्यकर्ते राकेश मोकल, आंतरराष्टीय पंच आरती बारी, मनोज म्हात्रे, नितिन पाटील, रमेश म्हात्रे, किरण मढवी, राजु पाटील, दिनकर पाटील, रुपेश म्हात्रे आदि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.