अंतिम विजेता ओम साईराम अंधेरी
| सुतारवाडी | वार्ताहर |
नवतरुण विकास मित्र मंडळ जावटे आयोजित खुले ओव्हर आर्म क्रिकेट सामने भोसले मैदान जावटे येथे आयोजित केले होते. या सामन्यात प्रथम – ओम साईराम अंधेरी, द्वितीय-शिवोदय स्पोर्ट क्लब जामगाव, तृतीय- सारस इलेव्हन भाले, चतुर्थ- घोटवल यांनी पटकावला. कार्यक्रमास बाबुशेठ खानविलकर, दत्ताराम खांबे, उपेंद्र जाधव, राजेश ढोकरे, लिंबाजी चिविलकर, विवेक खानविलकर, प्रकाश शोपोंडे, वैशाली शेपोंडे, संतोष चिविलकर, सुभाष राणे, संजोग मानकर, नवतरुण विकास मित्र मंडळ जावटेचे अध्यक्ष नंदकुमार चिविलकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सामने यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. समालोचन योगेश जाधव यांनी केले.