नबाब मलिकांचे ट्टिट रविवारी नवा गौप्यस्फोट करणार

मुंबई | प्रतिनिधी |
मंत्री नवाब मलिकांनी एक ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हॉटले ‘ललित’मध्ये अनेक गुपितं दडले आहेत. त्यासाठी आपण रविवारी भेटुयात असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. पण, आता नवाब मलिक रविवारी आणखी कोणते खुलासे करणार? याकडे लक्ष लागले आहे.
नवाब मलिकांनी दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. फडणवीसांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्सचा धंदा चालतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर फडणवीसांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. पण, नवाब मलिकांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मफतुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो?फफ असा सवाल फडणवीसांना केला होता. मफमागील पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होते. राज्याचे गृहखाते तुमच्याकडे होते. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला जागा राहिली नसतीफफ, असंही मलिक म्हणाले होते.
मफफडणवीसांच्या काळात हॉटेलमध्ये सतत पार्टीचे आयोजन केले जात होते. रात्र-रात्र पार्टी चालायची. 15 कोटींची ही पार्टी होती. इतक्या महाग पार्टीचे आयोजक कोण होते? सरकार बदलले आणि पार्ट्या बंद झाल्याफफ, असंही मलिक म्हणाले होते.
आता मलिकांना हॉटेल ललितचं नाव घेत त्याठिकाणी अनेक गुपितं दडली असल्याचं म्हटलं आहे. मलिकांनी त्यादिवशी उल्लेख केलेले फुटेज सार्वजनिक करणार की आणखी नवे कोणते खुलासे करणार? हे आता रविवारीच समजणार आहे.

Exit mobile version