श्रीवर्धन तालुक्यातील ग्रा.पं.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात एकूण 13 ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. त्यापैकी 04 ग्रा.पंचायतींचे सदस्य,सरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित 09 ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 22रोजी झाल्या.त्यांची मतमोजणी आज दि. 20 रोजी झाली.या निवडणुका जरी राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्या तरी या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचस्व असल्याचे दिसून येते.

निवडणुकांचे निकाल पुढीलप्रमाणे..
1) सायगाव : (फक्त सरपंच पदासाठी निवडणूक)
विजयी उमेदवार : श्रीम.स्वाती निगुडकर (राष्ट्रवादी
पुरस्कृत)
2) साखरोणे : सरपंच :रुचिता रा विचारे ( यांना सलग
तीन वेळा सरपंच पदाचा मान मिळाला आहे).तसेच सरपंचांसह 07 सदस्यांपैकी 05 सदस्य हे शिवसेनेचे (ठाकरे गट)निवडले गेले आहेत असे समजले.
3) शेखाडी : सरपंच….बबन दामू पाटील . 07 पैकी 05
सदस्य शिवसेना ठाकरे गटाचे निवडले गेले आहेत असे अनधिकृतपणे समजले.
4) वांजळे : सरपंच- आत्माराम
बापू गायकर .तसेच येथे 7 पैकी 05 सदस्य बिनविरोध
निवडून आले आहेत.
5) सर्वे : सरपंच नेहा सुभाष कदम ( बिनविरोध)(6) जसवली: सरपंच किशोर सुरेश मांडवकर (बिनविरोध).तसेच पंचायतीच्या दोन सदस्यांची निवड बिनविरोध झालेली असून 05 सदस्य
पंच म्हणून निवडून आले असून सरपंचांसह सर्वजण
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याचे समजले.
7) चिखलप : सरपंच प्रचिती विष्णु घडसे येथेही
7 पैकी 4 सदस्य बिनविरोध निवडून आले असून
त्यातील 2 राष्ट्रवादीचे, 4 भाजपा.चे व 01 सदस्य म.न
सेनेचे असल्याचे कळले.
8) वालवटी: सरपंच . नेहा
जावेद ढांगू.येथेही 3पंच बिनविरोध निवडण्यात आले असून या पंचायतीवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे.
9) दिवेआगर: ही तालुक्यातील मोठी व प्रतिष्ठेची निवड-
णूक समजली जात होती.येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस एका बाजूला विरुद्ध काॅन्ग्रेस व शिवसेना (शिंदे गट)आणि
अन्य पक्ष अशी जोरदार लढत होती.येथे राष्ट्रवादीचे
सिद्धेश कोसबे हे सरपंच म्हणून निवडून आले असून
8 जागा राष्ट्रवादीला व एक जागा शिवसेना ठाकरे गटाला
मिळाल्याचे समजले.
एकूण पाहता तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा
वरचष्मा दिसत असून भाजप प्रणित आघाडीने चिखलप ग्रा.पं.जिंकली आहे.तसेच शिवसेना ठाकरे गटाच्याही
काही जागा निवडून आल्या आहेत. मात्र शिवसेना
शिंदे गटाचे कोणत्याच ग्राम.पंचायतींत अस्तित्व दिसून
आले नाही.

Exit mobile version