। चिपळूण । प्रतिनिधी ।
तालुक्यातील वालोपे या गावातील शिवसेना पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आ.शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणारे विकास गुरव म्हणाले की, आ.शेखर निकम यांची कार्यपद्धती आणि तालुक्यातील विकास कामांचा लेखाजोखा पाहता आम्ही स्वेच्छा राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत. तर आ.निकम यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत, आपला पक्षप्रवेश जनसेवेसाठी अधिकाधिक ऊर्जा देईल, असे प्रतिपादन केले.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांमध्ये विकास गुरव, निलेश आयरे, संतोष आयरे, सुरेश सोलकर, सुजल कदम, सुनील आयरे, प्रदीप नाचरे, सुरेश चिपळूणकर, उमेश आयरे आदींचा समावेश आहे. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, पंचायत समिती बाबू साळवी, मिलिंद कापडी, निलेश कदम, संदेश गोरीवले, बाबू माळी, प्रकाश पवार, राजू शिंदे, रघुनाथ माळी, सचिन पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.







