राष्ट्रवादी आमदारांची जाहिरनाम्यातून दिशाभूल

। अहमदनगर । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून नगरमधील एका नागरिकाने सत्ताधारी पक्षाच्या आमदाराविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीरनाम्यातून आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याप्रकरणी आमदार आणि प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात गुरुवारी (23 सप्टेंबर) प्राथमिक सुनावणी होणार आहे. येथील निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचा प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांवर नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा, अशी मागणी भांबरकर यांनी यामध्ये केली आहे. भांबरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

Exit mobile version