पालीत शेकाप, राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत पहिल्याच निवडणुकीसाठी शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी निर्माण झाली असून,या आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी बल्लाळेश्‍वर मंदिरात दोन्ही पक्षांच्या नेेतेमंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शेकाप – राष्ट्रवादी आघाड़ी चे उमेदवार प्रभाग क्रमांक 11सौ.माधुरी अमीर वरंडे,प्रभाग क्र 12 सौ नलिनी गणेश म्हात्रे, प्रभाग क्र: 15 सौ रचना रवींद्र जाधव यांचे प्रचारार्थ नारळ वाढवण्यात आला. सर्वप्रथम अष्टविनायक बल्लाळेश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांसह नेतेमंडळींनी होम टू होम प्रचार फेरी काढली. व पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी व आशीर्वाद घेण्यात आले.
यावेळी शेकाप नेते धैर्यशील पाटील म्हणाले की शेकाप नेते जयंत पाटील व खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पाली नगरपंचायत निवडणूक शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवली जात आहे,असे सुचित केले.


पाली गावाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात विविध विकासकामांचा वचननामा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.
अदिती तटकरे,पालकमंत्री


पालीसह सुधागड तालुक्यात शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख विकासकामे केली आहेत, नगरपंचायत निवडणुकीत लोकाभिमुख चेहरे निवडणूक रिंगणात उभे आहेत, जनतेने या उमेदवारांना निवडून द्यावे.
धैर्यशील पाटील,माजी आमदार

यावेळी शेकाप नेते सुरेश खैरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे ,राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुजाता वडके, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे,तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, राजाराम देशमुख, राजेश गोळे, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, पराग मेहता, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, विठ्ठल सिंदकर, शशिकांत पाशीलकर, संतोष धाटवकर, अशोक शहा, योगेश शहा, विनायक जाधव,शशिकांत दंत, दीपक पवार, विनायक जाधव, सचिन साठे, रवी जाधव, अमित वरंडे,आरिफ मणियार, सुधीर साखरले, सुलतान बेनसेकर, मह्म्मदभाई धनसे, ललित ठोंबरे,महेश खंडागळे, किरण खंडागळे, इसाक पानसरे, विनय मराठे, इम्प्तीयाज पठाण, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version