राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडुन दगडफेक

घडलेली घटना कॅमेरामध्ये कैद
। सातारा । वार्ताहर ।
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यामधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शिंदे अवघ्या एका मताने पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय.
शशिकांत शिंदेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आलेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ज्यांनी शशिकांत शिंदेंविरोधात या निवडणुकीमध्ये कट रचला, त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केलीय, असं दगडफेक करणार्‍या शिंदे समर्थकांनी सांगितलं आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. आज फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्यात आल्याने आम्ही दगडफेक करुन निषेध करत आहोत, असंही या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Exit mobile version