राष्ट्रवादीची संघर्षाची तयारी – पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना संघर्षासाठी तयार राहा असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत.

पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. यामध्ये कठोर भूमिका घेण्याचा सल्ला देतानाच राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला कायम राहील असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे असा विश्‍वास पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसेच सत्तेमधून बाहेर गेल्यास आपण विरोधात बसण्यासही तयार असल्याचं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर बोलताना स्पष्ट केलंय.

भाजपची बॅनरबाजी
औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील अशा शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले आङेत. भाजपाकडून झळकावण्यात आलेल्या या बॅनर्सवर ङ्गहे माऊली तुझा कृपा आशिर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपुच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ देफ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

खरे सूत्रधार भाजपच
शिवसेनेने शेवटच्या क्षणी बाजी लावली तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा प्लॅन बी तयार आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाठीमागून सूत्र हलवित असल्याची माहिती आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आधीच कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. अशा स्थितीत राज्यपालपदाची जबाबदारी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आपल्या सर्व बंडखोर आमदारांसह मुंबईत येण्याऐवजी थेट गोव्यात जाऊन सर्व आमदारांसह गोव्याच्या राज्यपालांसमोर परेड करु शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या बंडखोर आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी मुंबईत आणले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भीतीने यापैकी काही आमदार फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आहे. याचे कारण कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांची जबाबदारी अजूनही त्यांच्याच हातात आहे.

सत्ता जाते म्हटल्यावर आमच्या आजुबाजूच्याही काही आमदारांच्या मनात दुसरीकडे जाण्याचे विचार येत आहेत. त्यांनी आमच्याकडे तसं बोलूनही दाखवलं. पण आम्ही त्यांना एवढचं सांगितलं की, या सगळ्यावर आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणे हाच एकमेव पर्याय आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
Exit mobile version